मुस्लिम मनाचा उत्कट आविष्कारः अजीम नवाज राही यांची कविता
मराठी कवितेत मुस्लिम कवींचे योगदान प्राचीन काळासूनच राहिलेले आहे. शेख मोहंद, शेख सुलतान, अल्लाखान, याकूब हुसेनी इ. मुस्लिम कवींनी संत कवितेत सुफी पंथाच्या मानवताधर्माची मांडणी केली आहे, तर तंत कवितेच्या काळात मराठी शाहिरी काव्य लिहिणारे सगनभाऊ, दादू पिंजारी, शेख कलंदर ह्यांची नावे आपल्यासमोर येतात. आधुनिक काळात शाहीर अमरशेख, प्रा. नसीमा पठाण, खलील मो नि, अल्लाउद्दीन …